जलसंवाद मासिकः उद्देश व वाटचालः
- मी डॉ. दत्ता देशकर, एक निवृत्त प्रचार्य. कधी काळी आपण पाण्याच्या क्षेत्रात काम करू असे स्वप्नातही नव्हते. मी एक वाणिज्य व अर्थशास्त्राचा विद्यार्थी. माझा जलशास्त्र वा भूगर्भ शास्त्राशी दूरान्वयानेही संबंध नव्हता.
- एका सभेत जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचे पाणी या विषयावरील एक भाषण ऐकले. आणि तेच माझ्या जीवनाला दिशा देणारे ठरले. त्या भाषणाने मी इतका प्रभावित झालो की मी माझे उर्वरित आयुष्य पाणी प्रश्नावर खर्च करण्याचा निश्चय केला.
- त्यांच्याच कार्यालयात (Global Water Partnership- South Asia ) त्यांचेबरोबर कार्यालयीन समन्वयक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी दोन वर्ष त्यांचेबरोबर काम केले. या दोन वर्षात पाण्याबद्दल मला इतकी माहिती मिळाली पाणी हा विषय मला नवीन राहिला नाही. या विषयात मी पारंगत झालो असा माझा आजही दावा नाही. पण पाणी या विषयाचा अभियांत्रिकी बरोबरच अर्थशास्त्र, समाजशास्त्र व व्यवस्थापन शास्त्र यांचा फार घनिष्ट संबंध आहे ही बाब माझ्या लक्षात आली. हाच धागा पकडून मी आज जलक्षेत्रात कार्य करीत आहे.
प्रत्येक माणसाची दररोजची पाण्याची गरज १३५ लिटर
स्वयंपाक व पिण्यासाठी | १५ लिटर |
---|---|
आंघोळीसाठी | २० लिटर |
कपडे धुण्यासाठी | २० लिटर |
भांडी घासण्यासाठी | २० लिटर |
इतर चिल्लर वापरासाठी | १५ लिटर |
संडास फ्लशसाठी | ४५ लिटर |
जगातील एकूण पाणी
समुद्रातील खारे पाणी | ९७.५ टक्के |
---|---|
पिण्यायोग्य गोडे पाणी (गोड्या पाण्यापैकी) | २.५ टक्के |
बर्फाच्या स्वरुपात पाणी | ७०.० टक्के |
भूजलाच्या स्वरुपात | ३०.० टक्के |
प्रत्यक्ष वापरासाठी (नदी, नाले, सरोवरातील) | ००.३ टक्के |
माणसाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण
रक्तातील पाणी | ८५ टक्के |
---|---|
मेंदूतील पाणी | ८० टक्के |
किडनीमधील पाणी | ८३ टक्के |
लिव्हरमधील पाणी | ८५ टक्के |
कातड्यातील पाणी | ७० टक्के |
हाडांतील पाणी | २५ टक्के |
लाळेतील पाणी | ९५ टक्के |
पाण्याचा वापर कशाकशासाठी?
- घरगुती वापरासाठी पाणी
- सार्वजनिक वापरासाठी पाणी
- शेतीसाठी पाणी
- कारखानदारीसाठी पाणी
- प्राणी पालनासाठी पाणी
- वीज निर्मितीसाठी पाणी
- वाहतुकीसाठी पाणी
- करमणूकीसाठी पाणी
- पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी पाणी